आपल्या वाचनाची इयत्ता सुधारलेली नाही!
पुस्तक गाजण्याविषयी मराठीत काही ठोकताळे आहेत. पैकी एक ठोकताळा म्हणजे, ऐतिहासिक, पौराणिक कादंबऱ्या अधिक लोकप्रिय होतात. हा समज पुरेसा खरा आहे, हे हरि नारायण आपटे, नाथमाधव, वि० वा० हडप यांच्यापासून रणजीत देसाई, विश्वास पाटील यांच्यापर्यंतच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या उदाहरणांनी दाखवून देता येईल. त्यामुळेच त्र्यं० शं० शेजवलकरांचं ‘पानिपत’ हे पुस्तक गाजलं तरी विकलं गेलं नाही, पण.......